माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दारव्हा तहसील कार्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी तालुक्यातील बोगस जन्मनोंदणीच्या प्रकरणावर गंभीर आक्षेप नोंदवत अपात्र घुसखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमय्या यांनी दारव्हा तालुक्यात एकूण १,८०० जन्मनोंदणी बोगस असल्याचा गंभीर आरोप केला.