जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार सोलापूरचे बेडर समाजाचे नेते बाबुराव जमादार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवारी सकाळी 11 वाजता पुणे येथील भिवंडी मध्ये झालेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या शासकीय जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा झाला. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री श्री जगद्गुरु डॉ. प्रसन्नानंद पुरी महास्वामी उपस्थित होते.