पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्याबाबत सध्या चर्चा सुरू असून याबाबत कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी खुलासा करावा, अशी मागणी एडवोकेट दीपक पवार यांनी केली आहे. आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी कारखान्याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कारखाना भाड्याने देण्याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.