पुरंदर तालुक्यातील प्रमुख सासवड शहर आणि ग्रामीण भागाला गराडे धरणातून पाणी पुरवठा केला जातो... परंतु या धरणाचा पाणीसाठा केवळ ३ टक्के राहिला आहे. अशी माहिती पाटबंधारे शाखा अधिकारी, गराडे अविनाश जगताप यांनी आज दिनांक 19 एप्रिल.रोजी सायंकाळी ५ वाजता माध्यमांना दिली आहे. लोकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी सासवड येथील नागरिकांना केले आहे.