आज नवरात्रीचा दुसरा दिवस. शहरांपासून ते अगदी छोट्या गावांपर्यंत सर्वत्र गरब्याचा जल्लोष सुरू आहे. देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आंजी या छोट्याशा गावात 'श्रीरंग'गरबा उत्सव समितीतर्फे आज 24 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता ग्रामीण महिला व मुलींसाठी एका खास गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश बकाने उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून भाजपाच्या चित्रा वाघ या उपस्थित होत्या या गरब्यात ग्रामीण महिला आणि मुलींनी इतका सुंदर आणि सुरेख गरबा सादर केल