आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी गंगापुर पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की, गंगापुर तालुक्यातील सोलेगाव येथे शिवना नदीमध्ये अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळला असून अगदी काही वेळात गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल होत आहे. ही धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर सोलेगाव शिवना नदी जवळ नागरिकांनी गर्दी केली होती पुढील तपास गंगापुर पोलिस ठाणे करत आहेत. अशी माहिती आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माध्यमांना दिली आहे.