डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर अथर्व सुदामे यांनी गणेशोत्सवानिमित्त हिंदू मुस्लिम एकतेचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर सुदामे यांना धमकीचे फोन आले होते. सुदामे यांनी सदर व्हिडिओ डिलीट करून माफी मागितली होती. त्यावर आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ च्या सुमारास मनसेच्या मिरा भाईंदर उपशहर अध्यक्षा रेश्मा तपासे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तपासे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली असून अथर्व सुदामे यांनी डिलीट केलेला व्हिडिओ पुन्हा टाकावा अस त्या म्हणाल्या आहेत.