आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील नाणेगाव शेत शिवारातील शेकडो हेक्टर वरील खरिपात पेरलेली कपाशी पिके पाण्याखाली घेण्याचे पाहायला मिळाले आहे कारण मागील दोन ते तीन दिवसापासून बदनापूर तालुक्यात व परिसरात मुसळधार अतिवृष्टी सुरू आहे यामध्ये शेतकऱ्यांची खरिपात पेरलेली कपाशी ही पूर्णतः पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत असून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.