कणकवली शहरातील बांधकरवाडी येथे भाड्याच्या घरात सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. भल्या पहाटे ४ वा. सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत शुभम उर्फ कुंदन संतोष गोसावी (२०, कणकवली - बांधकरवाडी) याला एलसीबीच्या पोलिसांनी अटक केली.