काँग्रेस व राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वर्गीय मातोश्रींविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.या निषेधार्थ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास धारावी येथे ‘माफी मागो आंदोलन’ आयोजित करण्यात आले. या आंदोलनात आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन, भाजपा मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा शीतल गंभीर यांच्यासह इतर मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.