करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय सुटल्यानंतर दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्या मोठ्या चुलत बहिणीला मोबाइल आणि चिठ्ठया देण्यास सांगणाऱ्या दोन युवकांवर करमाळा पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी गणेश एकनाथ ढेरे व यश काका कोळी यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.