हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाज लढतोय,महाराष्ट्र राज्यात ठीक ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आरक्षण मागणीचा इशारा देतोय,जर मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू होत असेल तर हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची एसटी म्हणून नोंद आहे, नोंदी नुसार बंजारा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ६ ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, या मोर्चात उदगीर तालुक्यातील शंभर क्रूझर गाड्या दाखल झाल्याची माहिती लक्ष्मण चव्हाण यांनी दिली