पर्यावरण, स्वच्छता, बेटी बचाओ बेटी पढाओ यासह भाईचाराचा संदेश देऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षिरसागर यांनी दि. 26 ऑगस्ट रोजी आसेगाव पोलिस स्टेशन येथे शांतता समितीच्या बैठकीत केले. सदर बैठकीला सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठीत नागरिक व अधिकारी व गणेश मंडळाच्या अध्यक्षांची उपस्थिती होती.