आज शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास मिराडोर कार्यालय, ग्रँट रोड मलबार हिल येथे आयोजित नियमित जनता दरबारात महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि मागण्या मनमोकळेपणाने ऐकून घेतल्या आहे. या सर्व प्रश्नांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गांभीर्याने ऐकून घेतले व तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.