नागपूर शहरातील खड्ड्यांच्या समस्यांना घेऊन आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. पावसाळा सुरू झालेला आहे परंतु नागपूर शहरात खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे समजायला मात्र मार्ग नाही. रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चाललेली आहे ज्यामुळे दररोज अपघात होत आहे. प्रशासनाकडून सातत्याने होत असलेला हलगर्जीपणा आणि निष्क्रिय भूमिका नागपूरकरांसाठी घातक ठरत आहे.