आज दिनांक सहा सप्टेंबर संध्याकाळी आठ वाजता छत्रपती संभाजी नगर शहर जिल्ह्यामध्ये गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुका या मोठ्या थाटात विकतानाच पाहायला मिळाले आहे. तर दुसरीकडे पैठण तालुक्यातील बिडकीन गावामध्ये गणेश मंडळांनी आपले पारंपारिक खेळ सादर करून हातामध्ये आगीचे टेंभे घेत मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात आले. या साहशी सादरीकरणामुळे गणेश भक्तांचे या मंडळाने चांगलेच लक्ष वेधून घेतल्याची यावेळी पाहायला मिळाले आहे.