नागोठणे येथील पोलीस ठाणे हद्दीतील सुकेळी खिंडीच्या उतारावर रविवार (दि.०७) सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो व एस टी बसचा अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक गाडीत अडकल्याने जखमी झाला असुन त्याला सुखरूप बाहेर काढून उपचारकरीता रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (दि.०७) सप्टेंबर रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून पेणकडे जाणारा टेम्पो क्रं. एमएच ०८ एपी १९४४ हा सकाळी ११.४५ वाजण्याच्या दरम्यान सुकेळी खिंडीतील अति वेगात येत होते.