दारव्हा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळ पथकाने सलग दोन कारवाया करत अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या युवकास अटक केली तर बसस्थानक परिसरातील पॉकिटमारी प्रकरणातील आरोपीकडून १० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती दारव्हा पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे आज दिनांक 23 ऑगस्टला दु. ३ वाजता दरम्यान माध्यमांना दिली.