मतदार अधिकार यात्रे दरम्यान काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या शिवीगाळीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. मी आधीही तेच म्हटले होते आणि आज ते स्पष्ट शब्दात पुन्हा सांगतोय, राहुल गांधींचे मन चोरीला गेले आहे. जेव्हा मन चोरीला जाते तेव्हा लोक अशी विधाने करतात. तुम्ही स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणवता, पण जर तुम्ही अशी विधाने करत असाल तर तुम्हाला राष्ट्रीय नेता म्हणवण्याचा काय अधिकार आहे.