फुटाळा येथिल नेवारे प्लाट च्या पोल्ट्री शेड मध्ये भला मोठा अजगर दिसून आले असता तातडीने सर्प मित्र पप्पी इंगळे सौंदड यांना कळविण्यात आले असता सर्प मित्र पप्पी इंगळे यांनी अजगर असलेल्या ठिकाणी पोहचुन अजगराला मोठ्या शिताफीने पकडले आणि त्यास नैसर्गिक अधिवासात सिंदीपार जंगल एरियात सोडुन देण्यात येवून भल्या मोठ्या अजगराला जीवदान देण्यात आले यावेळी सामजिक कार्यकर्ते दामोदर नेणारे यांनी विशेष भुमिका पार पाडली.