सालेकसा तालुक्यातील कोटजंभूरा येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील सुंदरलाल लिल्हारे यांचा मुलगा ओमप्रकाश लिल्हारे वय 37 वर्षे यांचे 6 सप्टेंबर रोजी 5 वाजे दरम्यान नाशिक सिन्नर येथे गणेश विसर्जन करताना पाण्यात बुडून निधन झाले ओमप्रकाश लिल्हारे हा 7 वर्षापासून नाशिक येथे एका कंपनीत कार्य करीत असून मोहल्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन करण्याकरिता गेले असता पाण्यात तोल गेल्याने त्याचा निधन झाला त्याला मूळगाव कोटजंभूरा येथे आणून आज त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले