दारूच्या आहारी गेलेल्या विक्षिप्त बुद्धीच्या मुलाने आईला मारहाण केल्याची घटना ता. 10 बुधवारला सकाळी 11 वाजता तालुक्यातील वडगांव (जंगली) येथे घडली. याप्रकरणी सौ. प्रमिला सुभाष शेंद्रे वय 55 रा. वडगांव (जंगली) यांनी सायंकाळी 6.30 वाजता मुलगा सुमित सुभाष शेंद्रे वय 35 रा. वडगांव (जंगली) याचे विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.