परळी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी निवडणुकीसाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंजय मुंडे यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज भरणे पसंत केले. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी लाडक्या बहिणींसोबत धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवार दाखलकरण्यात अगोदर बारा ज्योतिर्लिंग पैकी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.