जहागीरदारवाडी लमाण तांडा येथे जागेच्या वादातून निर्माण झालेल्या तणावात एका कुटुंबाच्या सदस्यांनी दुसऱ्या पक्षावर गटाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केली. फिर्यादी रामदास राठोड (वय ३२) यांच्याकडून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. ३१ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, तुकाराम राठोड, नितीन राठोड, सागर राठोड, मोतीराम राठोड आणि विजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी चार वाजता दिली.