राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी निघालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते ईश्वर उखा पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.