यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दीप्ती घारे यांनी एक सप्टेंबरला दुपारी पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे यशोधरा नगर येथून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जिथे घरमालकाच्या अल्पवयीन मुलाने किरायदाराच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.