भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पक्षाच्या वतीने आयोजित सेवा पंधरवडा 2025 निमित्त जिल्हा कार्यशाळा विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्रजी कोठेकर यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली पार पडली. ही कार्यशाळा भंडारा येथील भाजप कार्यालयात 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पार पडली. या कार्यशाळेत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.