रात्रीच्या सुमारास चुलबंद नदी घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैधरीत्या रेती चोरी करणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडल्याची घटना घडली. ही घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा ११ वाजताच्या सुमारास मेंढा भुगाव येथे घडली. या घटनेत पालांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक-मालक आकाश किसन खंडाईत (२५) रा पहाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.