भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे.माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलाला तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी देण्यात आली आहे. भाजपकडून आमदार नमिताताई मुंदडा यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांची फटाक्यांची आतिषबाजी व महापुरुषांच्या चौकात घोषणांनी अंबाजोगाई दणाणली.