महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन बुधवारी (दि.२७) वाजत-गाजत होणार आहे. जिल्ह्यात ६९६ ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना, तर पाच हजार ९३० घरांत गणपतीची स्थापना होणार आहे. गणेशोत्सवात दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. त्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी राहायची. शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी पोलिसांनी आपापल्या पोलिस ठाण्यां