बबनराव भुरे यांनी त्यांच्या तेरा वर्षे मुलाला शाळेत नियमित जाण्याबाबत अटकले असता तो शाळेत जातो असे म्हणून घरून काटोल बस स्टॉप येथे गेला व तेथून तो कोंढाळी बसने निघून गेला. दरम्यान सर्वत्र शोध घेतला असता हा मुलगा कुठेही आढळला नाही. याप्रकरणीच्या जलालखेडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून या मुलाला बुट्टी बोरी येथून ताब्यात घेतले