अनंत चतुर्दशीनिमित्त होणाऱ्या विसर्जनाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तयारी केलेली आहे. हा उत्सव राज्योत्सव म्हणून सरकारने घोषित केलेला आहे. उद्या 6 हजार 500 सार्वजनिक गणेश मूर्तीचं आणि जवळपास एक ते दीड लाख घरगुती मूर्तींचे विसर्जन आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कृत्रिम तलाव आणि सार्वजनिक मूर्तीच्या विसर्जनासाठी चौपाट्या तयार आहेत.