शहर पोलीस स्टेशन आणि सात मजली इमारत यांच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अचानक एका पुतळ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ही जागा सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असतानाही कोणतीही पूर्वसूचना अथवा परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अनधिकृत कामाचा तीव्र निषेध करत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी हे बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी केली. त्यांनी या संदर्भात महानगरप