फोंडशिरस येथे नाना अण्णा वाघमोडे यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले धर्मेंद्र महादेव वाघमोडे व अंकुश महादेव वाघमोडे दोघे रा. फोंडशिरस, ता. माळशिरस यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुमन शाम व शाम चंडक यांनी जामीन मंजूर केल्याची माहिती ॲड. रितेश थोबडे यांनी सोमवारी साय 7 वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकरांना दिली. यात हकीकत अशी की, यातील मयत व आरोपी हे एकमेकांचे शेजारी राहण्यास होते. त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता मयताचे घर हे आरोपींच्या जागेत येत होते.