धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरी व वाहनातून माल काढून चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद केले आहेत. मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली वरूडा पारधी पिढीत छापा टाकून सिद्राम पवार व रमेश पवार यांना पकडण्यात आले. त्यांच्या शेडमधून ५ मोटारसायकली, केबल वायर व खापरी पेंड्याची पोती असा दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.