गडचिरोली : आज दि २९ ऑगस्टला सकाळी ९ वाजेच्या दरम्मान राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने भव्य रॅलीचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कॉम्पेलक्स येथे करण्यात आले. आजचा हा दिवस हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्य दरवर्षी साजरा केला जातो. आजच्या या दिवसा प्रसंगी राष्ट्रीय स्तरावर जोधपूर येथे महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना सत्कार करून गौरविण्यात आले