गणेशोत्सवात मराठी गीत, भजन, कीर्तन, समाज जागरूकता असे कार्यक्रम करून आपल्या राज्याचे मराठीपण टिकवूया असे आवाहन मिरा रोड येथील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास केलं आहे. गणेशोत्सवात फक्त मराठी गाणी वाजवू याचा निर्धार करणाऱ्या मुंबई "सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केलं आहे.