तालुक्यातील दिघंची येथे जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यावर मारहाणीची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दिघंची येथील बाळासाहेब नाना सावंत (वय ६२, रा. मायणी रोड, मुक्त इंग्लिश मीडियम स्कूल समोर) यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या गट क्र. ७१२ मधील शेतजमिनीत त्यांनी जनावरे बांधली होती. त्यावेळी संजय सावंत हा शेतात येऊन आमच्या शेतात जनावरे बांधली सोडताना अशी धमकी देत शिवीगाळ केली व दरम्यान प्रदीप सावंत हातात बांबू घेऊन आला व बांबूने वृद्धास मारहाण केली