कल्याण डोंबिवली शहरात खड्डे पडले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल , शहर अभियंता अनिता परदेशी यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह कल्याण पूर्वेतील १०० फुटी रस्त्याची पाहणी केली. यावेळी महेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.