उन्नत भारत अभियान अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या मोहिमेचे उद्घाटन डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते गुरुवारी १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातंर्गत ’एक पेड माँ के नाम’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत चार जिल्हयातील २१८ महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या महाविद्यालयात एकूण ३७ हजार स्वयंसेवक कार्यरत असून प्रत्येकी तीन झाडे लावत आहे