बेजुरपली पर्सेवाडा चौदा किलोमीटरच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. मार्गावर जागोजागी मोठ-मोठ खड्डे पडले आहेत. परिणामी अपघातांच्या घटनेत वाढ शक्यता निर्माण झाली आहे. ही मोठी समस्या असताना प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनीधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. साधारणपणे वीस ते पंचवीस गावांचा या मार्गावर थेट संबंध येतो. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी मोठ्या प्रमाणावर सिरोंचा तालुका ठिकाणी जाण्यासाठी रोज मार्गक्रमण करतात.