अज्ञात चोरट्यांनी सोनार कारागिराचे घर फोडत रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने असा 4 लाख 77 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील मुळे गल्ली परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या प्रकरणात वैजापूर पोलिसांत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणात राजेंद्र प्रभाकर बनसोडे वय 52 वर्षे राहणार मुळे गल्ली वैजापूर यांनी फिर्याद दिली आहे.