संगममाहुली येथे धोकादायक वळणावर अपघातात एकाच मृत्यू सातारा ते कोरेगाव जाणाऱ्या रस्त्यावर सातारा तालुक्यातील संगममाहुली येथील - ब्रिटीशकालीन पुलाच्या अलिकडे धोकादायक वळणावर रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक वसंतराव आनंदराव माने (वय ६५, रा. भोसे, ता. कोरेगाव) यांचा मृत्यू झाला आहे. ते दुचाकीवरुन कोरेगावकडे निघाले होते. तर ट्रक कोरेगाव बाजूकडून साताऱ्याकडे येत होता. वसंतराव माने हे सेवानिवृत्त माजी सैनिक होते.