गेल्या तीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. तरीही अवैध मार्गाने दारूची विक्री सुरू असते. या विरोधात अतिदुर्गम मन्नेराजाराम गावाने दारूबंदीच्या दिशेने ठोस पाऊल टाकत ग्रामसभेत महत्त्वाचा ठराव केला आहे. यात गावाकऱ्यांना अवैध दारू विक्रेत्याच्या अंत्यसंस्कारातही सहभागी होऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.