पिंगुळी पाट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे कुडाळ येथील नेते अतुल बंगे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान सा. बां. विभागातील अधिकार्याच्या बेजबाबदारपणामुळे ही परिस्थिती ओढवली असून याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.