कवठेमहांकाळ तालुक्यातील गुंठेवारी जमीन नियमितीकरण करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंडल अधिकारी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. मारुती विलास खोत (वय ४८) आणि संजय किसन हारगे (वय ४५, दोघे रा. विठुरायाचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.