जत तालुक्यातील बालगाव येथे बसवेश्वर ऑनलाईन सेंटरला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या आगीत संगणक साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मल्लिकार्जुन गुरु सिद्ध मलाबादी यांच्या मालकीचे हे ऑनलाईन सेंटर असून, आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.