1 ऑगस्ट 2025 पासून खरीप हंगामाची अधिकृत सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी DCS 7/12 पोर्टलवर अनिवार्यपणे करणे आवश्यक आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, ई-पीक नोंदणी केल्याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजना, हमीभाव खरेदी, पीक कर्ज, तसेच अॅग्रीस्ट्रॅक अंतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळू शकणार नाही.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना आपल्या सातबारा उताऱ्यावर वेळेत पीक नोंदणी करून सर