बारामती तालुक्यातील मोरगाव येथे एका माथेफिरूने महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला होता.यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला .यानंतर आज दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी साडे आकरा वाजता पुरंदर तालुक्यातील नीरा येथील वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. सबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय. त्याच बरोबर या मृत महिलेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय .तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केलीय.