नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील निझरा नदीला सातपुड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात प्रवाशांनी भरलेली बोलेरो गाडी अडकली आहे. सावरपाडा धनपूर गावाला जोडणारा पूल निधी अभावी अपूर्ण असल्यामुळे या पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना नाईलाजास्तव मार्ग काढावा लागत आहे